Saturday, June 13, 2015

पसायदान

ll ज्ञानेश्वर माऊली ll
आता विश्चात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे 
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढ़ो
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे 
दुरिताचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात 
वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मंदियाळी
अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां 
चलां कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणींचे गांव
बोलते जे अर्णव, पीयूषाचे 
चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु 
किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहींलोकीं
भजि जो आदिपुरुरवी, अखंडित 
आणि ग्रंथोपवीजिये, विशेषी लोकी इये
दृष्टादृष्टविजयें, हो आवे जी 
येथ म्हणे विश्चेश्चरावो, हा होईल दानपसावो
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला 


              *****



1 comment: